अलका गौरी यांचे प्रतिपादन
प्रचंड उत्साहात युवती संमेलनसोलापूर, प्रतिनिधीसमाजात महिलांवर होणार्या अत्याचारावर केवळ टिका न करता महिलांनी या विरोधात सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. ही समस्या केवळ मलमपट्टीने सुटणार नसून त्याच्या मूळावर घाव घालण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीच्या अखिल भारतीय युवा आयामप्रमुख अलका गौरी यांनी केले.
स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीच्या संवर्धिनी आयामाकडून सोमवारी येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित युवती संमेलनात त्या बोलत होत्या. विवेकानंदांच्या दृष्टीकोनातून महिला सुरक्षितता हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर संवर्धिनी आयामाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख डॉ. शोभा शाह, सोलापूर जिल्हा प्रमुख अमृता बदामीकर, जिल्हा सहप्रमुख वीणा नाईक होत्या.अलकागौरी जोशी म्हणाल्या, स्त्री बद्दलची भारतीयांची संकल्पना इतर देशांच्या तुलनेत विस्तृत आहे. भारतीय संस्कृतीत स्त्री हे मनोरंजनाचे किंवा व्यवस्थेचे साधन नसून स्त्रीला आदीशक्ती म्हटले आहे. महिलांवर पूर्वीही अत्याचार होतच होते. परंतु काही दशकांपासून महिला स्वतंत्र होऊ लागल्यामुळे त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. महिलांची सुरक्षितता ही केवळ महिलांची नसून संपूर्ण समाजाची सुरक्षितता असते, हे समाजाला पटवून देण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंद ही स्त्री शिक्षणाच्याबाबतीत आग्रही होते. भगिनी निवेदीता भारतात आल्यानंतर स्वामीजींनी त्यांच्याकडे भारतीय मुलींना शिकविण्याची जबाबदारी दिली होती असे त्यांनी सांगितले.
स्त्रीला भारतात सन्मान मिळत नाही हा केला जाणारा प्रचार निखालस खोटा आहे. सद्य सामाजीक परिस्थिती या आरोपांना बळकटी देणारी होत असली तरी हे चित्र पालटून भारताला जागतिक महासत्ता बनविण्याची जबाबदारी युवतींनी घेतली पाहिजे. युवतींनी आत्मविश्वासाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे असे संवर्धिनी आयामाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख डॉ. शोभा शाह म्हणाल्या, देशातील आध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक, राजकीय क्षेत्राात संभ्रमाचे वातावरण आहे. अशाप्रसंगी देशाला स्वामी विवेकानदांच्या विचारांची गरज आहे. हाच विचार देशाला जगद्गुरूपदी विराजमान करु शकेल. स्वामीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त केवळ देशातच नव्हे तर जगातही जागरण केले जात आहे. त्यासाठी भारत जागो विश्व जगाओ हे ब्रीद निश्चित करण्यात आले आहे. प्रा. अनिता अलकुंटे यांनी सूत्रसंचालन तर सोलापूर जिल्हाप्रमुख अमृता बदामीकर यांनी आभारप्रदर्शन केले. प्रारंभी पल्लवी घोगले यांनी शांतिमंत्र म्हटले. तर पल्लवी सोलापुरे यांनी मुक्त गगन हे गीत गायिले.
या कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ निशिगंधा माळी, तहसीलदार शिल्पा ठोकडे, महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ङ्गिरदोस पटेल, शुभांगी बुवा, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कुंकुमतिलक लावून युवतींचे स्वागत करण्यात आले. सर्व सहभागी युवतींना स्वामी विवेकानंद व पाच दीपस्तंभ हे पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
लव्ह जिहादाचा वाढता धोका घातक
भारतात महाविद्यालयीन युवतींना ङ्गसवून त्यांना लव्ह जिहादच्या कटाच्या माध्यमातून ङ्गसविण्याचे प्रमाण वाढत आहे. पैसा किंवा इतर वस्तूंचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात अडकविण्याचा लव्ह जिहादचा धोका वाढत असून युवतींनी यापासून सावध रहावे असे आवाहन अलकागौरी जोशी यांनी यावेळी युवतीनंा केले.
वंदे मातरम अवतरण दिन
१८७५ च्या कार्तिक महिन्यातील शुक्ल नवमीला वंदे मातरम हे गीत ऋषी बंकिमचंद्रांच्या लेखनीतून कागदावर अवतरले होते. सोमवारी कार्तिक शुक्ल नवमी असल्याने कार्यक्रमानंतर संपूर्ण वंदे मातरम गाऊन स्मरण करण्यात आले. यावेळी प्रा. अलकुंटे म्हणाल्या, पुस्तके आणि ग्रंथ यांचा वाढदिवस किंवा जन्मदिवस साजरे होत नाहीत. पण भगवद्गीता हा ग्रंथ याला अपवाद आहे. गीत किंवा कवितेचा जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा नाही पण याला अपवाद आहे वंदे मातरम हे गीत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम’ला मंत्राचे स्वरुप प्राप्त झाले होते. जगाच्या इतिहासात इतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही देशभक्तीपर गीताने घेतली नाही.
No comments:
Post a Comment