Sunday 27 October 2013

विवेकानंद साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा विवेक घळसासींच्या हस्ते शुभारंभ

 सोलापूर | येथे ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होणार्‍या विवेकानंद साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन रविवारी सकाळी निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते झाले. स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सार्ध शती समारोह समितीतर्फे हे संमेलन होत आहे. भूमिपूजनप्रसंगी सार्ध शतीचे अखिल भारतीय संयोजक किशोर टोकेकर, पश्‍चिम क्षेत्र सहसंयोजक बसवराज देशमुख, समितीचे जिल्हा अध्यक्ष धर्मराज काडादी, स्वागताध्यक्ष ए. जी. पाटील, कार्याध्यक्ष डॉ. गिरीश कुमठेकर, स्वागतसचिव प्रशांत बडवे, पेंटप्पा गड्डम, दिलीप पेठे, केंद्राचे संचालक दीपक पाटील, हरिभाऊ गोडबोले, राजन रिसबुड, प्राचार्या माया स्वामी, समर्थ बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्यीकांना विवेकानंदांचे विचार साहित्यीक अंगाने सर्वसामान्यांपर्यंत समर्थपणे पोहोचवता यावेत, यासाठी या संमेलनाचे आयोजन असल्याचे श्री. घळसासी म्हणाले. आता संमेलन होईपर्यंत व्यक्तीगत आवश्यकता बाजूला ठेवून अधिकाधिक लोकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन केले. नवशिक्षित बहुजन समाजातील युवकांमध्ये आणि विशेषत: ग्रामीण भागात विवेकानंदांच्या विचारांविषयी पराकोटीचे आकर्षण असल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले.
जीवनव्रती कार्यकर्ते श्री. किशोरजी यांनी सार्ध शतीनिमित्त जगभर सुरू असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत उभा रहावा, या हेतूने देशभरातील चार लाख गावांपर्यंत स्वामीजींचे विचार पोहोचण्यात आले. शोभायात्रांमध्ये ५३ लाख लोकांनी सहभाग नोंदवला. सामुदायिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात दोन कोटींहून अधिक विद्यार्थी आणि भारत जागो दौडमध्ये ३२ लाखांहून अधिक महाविद्यालयीन युवकांचा सहभाग राहिल्याचे ते म्हणााले.
स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचा व विचारांचा देशात प्रभाव आहे. १५० व्या जयंतीनिमित्त राबवलेल्या उपक्रमांमधून हे स्पष्ट झाल्याचे धर्मराज काडादी यांनी म्हटले. तसेच समितीतकडून येत्या काळात राबवल्या जाणार्‍या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास दुर्गाप्रसाद मिणियार, सुहास देशपांडे, वल्लभदास गोयदानी, महेश आंदेली, प्रा. अनिता अलकुंटे, प्रा. शिवराज पाटील, कवी देवेंद्र औटी, नंदकुमार चितापुरे, मदगोंडा पुजारी, आनंद भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संमेलनाचे समन्वयक सिद्धाराम पाटील यांनी केले.
**********
फोटो ओळ :

मंडप उभारणीच्या शुभारंभप्रसंगी विवेक घळसासी, धर्मराज काडादी, ए. जी. पाटील, प्रशांत बडवे, दीपक पाटील, राजन रिसबूड, माया स्वामी, दिलीप अत्रे दिलीप पेठे आदी.




Monday 21 October 2013

नरेंद्र कोहली होंगे विवेकानंद साहित्य संमेलन के अध्यक्ष

माननीय संपादक,
इस वृत्त को आपके विख्यात पत्रिका में यथोचित समय प्रकाशित करे यह प्रार्थना.
भवदीय,
सुनील कुलकर्णी
कार्यालय प्रमुख, विवेकानंद साहित्य संमेलन,
सोलापूर. संपर्क : 09371934407
 

*******
सोलापूर | प्रतिनिधीविख्यात हिंदी साहित्यकार श्री. नरेंद्र कोहली सोलापूर (महाराष्ट्र) में होनेवाले ‘विवेकानंद साहित्य संमेलन’ के अध्यक्ष के नाते मनोनित किए गये है. ९ और १० नवंबर २०१३ इन दो दिनों में होनेवाला यह साहित्य संमेलन स्वामीजी के १५० वे जयंती वर्ष के अनुलक्ष्य में आयोजित किया जा रहा है. इस तरह का यह शायद पहला ही साहित्य संमेलन होगा. संमेलन के निमंत्रक, दै. लोकसत्ता के पूर्व संपादक सुधीर जोगलेकर, संयोजक अरुण करमरकर तथा स्वागत समिती के सचिव प्रशांत बडवे ने यह जानकारी दी.
महाराष्ट्र के सभी विभागों से तथा देश के प्रमुख शहरों से लगभग दो हजार प्रतिनिधी इस संमेलन में सहभागी होंगे. संत साहित्य के ज्येष्ठ अभ्यासक तथा समीक्षक डॉ. सदानंद मोरे (पुणे विश्‍वविद्यालय), राष्ट्रीय विचारों के प्रख्यात विचारक श्री. तरुण विजय, स्वामी बुद्धानंद, नाट्य एवं चित्रपट कलाकार राहुल सोलापूरकर आदि मान्यवर लेखक तथा विचारवंत इस संमेलन के विविध सत्रों मे मार्गदर्शन करेंगे.

सोलापूर के प्रख्यात उद्योजक तथा शिक्षाविद ए. जी. पाटील संमेलन के स्वागताध्यक्ष रहेंगे. इस संमेलन में प्रतिनिधी के नाते अधिकाधिक युवक युवतीयां सहभागी हो, ऐसा आवाहन संयोजन समिती की ओर से किया गया है. अधिक जानकारी के लिए
vsammelan13@gmail.com इस ई मेल पते पर या ९४२२६४९२३९ इस दूरभाष पर संपर्क करें.

संमेलनाध्यक्ष नरेंद्र कोहलीजी का अल्प परिचय
एक ज्येष्ठ हिंदी साहित्यकार के नाते कोहलीजी साहित्य विश्‍व में पहचाने जाते है. स्वामी विवेकानंद के चरित्र पर आधारित ‘तोडो कारा तोडो’ यह ग्रंथमालिका, प्रभू रामचंद्र के संबंध में ‘अभ्युदय’, ‘न भूतो न भविष्यती’, ‘वासुदेव’ यह उनके द्वारा निर्मित साहित्य संपदा है. १९७० से लेकर २००६ तक — ७८ ग्रंथ लिखने का अनोखा विक्रमी कार्य आपने किया है. इसी कारण से १९७५ के बाद का कालावधी हिंदी साहित्य विश्‍व में ‘कोहली युग’ माना जाता है.

Sunday 6 October 2013

विवेकानंद साहित्य संमेलन ही शिक्षक- प्राध्यापकांसाठी संधी

सोलापूर | शिक्षणाविषयी स्वामी विवेकानंदांनी मूलभूत चिंतन मांडले. भारतातील पहिले विवेकानंद साहित्य संमेलन सोलापुरात होत असून या निमित्ताने देशातील नामवंत लेखक आणि विचारवंत सोलापुरात येणार आहेत. ही बाब शहर आणि जिल्ह्यातील शिक्षक-प्राध्यापकांसाठी अनमोल संधी आहे, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटक व योगतज्ज्ञ धनंजय सूर्यवंशी यांनी केले.
विवेकानंद साहित्य संमेलनात योगदान देऊ इच्छिणार्‍या शिक्षक प्राध्यापकांसाठी विवेकानंद केंद्रात रविवारी सकाळी बैठक झाली. त्यात ते बोलत होते. या प्रसंगी शहर व जिल्ह्यातील ३० शाळा महाविद्यालयांचे शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर संमेलन होणार आहे. या कामात शिक्षकांना सहभागी करून घेता यावे यासाठी विवेकानंद केंद्रात रोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती प्रा. व्यंकटेश तुम्मनपल्ली यांनी दिली.
बैठकीत दयानंद महाविद्यालय, संगमेश्‍वर महाविद्यालय, स्वामीनारायण गुरुकुल, एसईएस पॉलिटेक्निक, अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालय, एसव्हीसीएस अध्यापक, दिंडूर जि.प. शाळा, कासेगाव शाळा, दयानंद शिक्षणशास्त्र, वालचंद, हरिभाई, ज्ञानप्रबोधिनी, रामकृष्णपंत बेत रात्र प्रशाला, श्री भगवती गौरीमाता महाविद्यालय आदी संस्थांतील प्राध्यापक सहभागी झाले.

Friday 4 October 2013

प्रति,
माननीय संपादक,
महोदय,
स्वामी विवेकानंद संमेलनाविषयीची पुढील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
आपला स्नेहांकित,
अरविंद जोशी, प्रसिद्धी प्रमुख साहित्य संमेलन


**********

विवेकानंद साहित्य संमेलनासाठी
शिक्षक-प्राध्यापकांना आवाहन

सोलापूर (प्रतिनिधी) ः विवेकानंद साहित्य संमेलनाच्या कार्यात योगदान देऊ इच्छिणार्‍या शिक्षक आणि प्राध्यापकांसाठी रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकानंद केंद्र, १६५ रेल्वे लाईन्स, होमगार्ड मैदानाजवळ येथे होणार्‍या या बैठकीस जिल्ह्यातील इच्छुक शिक्षक, प्राध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विवेकानंद केंद्राने केले आहे. सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होणार्‍या विवेकानंद साहित्य संमेलनासाठी राज्यातून सुमारे दीड हजार प्रतिनिधी येणार आहेत. स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती, महाराष्ट्र प्रांताने संमेलनाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६५८००८०३