Sunday 6 October 2013

विवेकानंद साहित्य संमेलन ही शिक्षक- प्राध्यापकांसाठी संधी

सोलापूर | शिक्षणाविषयी स्वामी विवेकानंदांनी मूलभूत चिंतन मांडले. भारतातील पहिले विवेकानंद साहित्य संमेलन सोलापुरात होत असून या निमित्ताने देशातील नामवंत लेखक आणि विचारवंत सोलापुरात येणार आहेत. ही बाब शहर आणि जिल्ह्यातील शिक्षक-प्राध्यापकांसाठी अनमोल संधी आहे, असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटक व योगतज्ज्ञ धनंजय सूर्यवंशी यांनी केले.
विवेकानंद साहित्य संमेलनात योगदान देऊ इच्छिणार्‍या शिक्षक प्राध्यापकांसाठी विवेकानंद केंद्रात रविवारी सकाळी बैठक झाली. त्यात ते बोलत होते. या प्रसंगी शहर व जिल्ह्यातील ३० शाळा महाविद्यालयांचे शिक्षक प्राध्यापक उपस्थित होते. ९ आणि १० नोव्हेंबर रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर संमेलन होणार आहे. या कामात शिक्षकांना सहभागी करून घेता यावे यासाठी विवेकानंद केंद्रात रोज सायंकाळी ६ ते ८ यावेळेत कार्यालय सुरू करण्यात आल्याची माहिती प्रा. व्यंकटेश तुम्मनपल्ली यांनी दिली.
बैठकीत दयानंद महाविद्यालय, संगमेश्‍वर महाविद्यालय, स्वामीनारायण गुरुकुल, एसईएस पॉलिटेक्निक, अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालय, एसव्हीसीएस अध्यापक, दिंडूर जि.प. शाळा, कासेगाव शाळा, दयानंद शिक्षणशास्त्र, वालचंद, हरिभाई, ज्ञानप्रबोधिनी, रामकृष्णपंत बेत रात्र प्रशाला, श्री भगवती गौरीमाता महाविद्यालय आदी संस्थांतील प्राध्यापक सहभागी झाले.

No comments:

Post a Comment